
पिंपरीत दोन गटांत हाणामारी
पिंपरी, ता. ९ : पिंपरीतील सेनेट्री चाळ येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी प्राणघातक हल्ल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
यश राजेश बोहत (वय १९, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शक्ती रामरतन बोहत (वय ४५) याला अटक केली आहे. तर लता रामरतन बोहत (वय ६२), यश जाधव (वय २१), लड्या उर्फ हर्ष अमर बोहत (वय १८), श्रुती शक्ती बोहत (वय १९), साहिल बोहत (वय १८), काजल (वय २०, सर्व रा. सेनेट्रीचाळ, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता. ७) रात्री पावणे बाराच्या सुमारास यशसह त्यांची आई, होणारी सासू, मेहुणी असे बोलत थांबले असताना आरोपींनी यशला मारहाण केली. आरोपी शक्ती व यश जाधव याने कोयता व चाकू हवेत भिरकावून दमदाटी करीत दहशत निर्माण केली. लड्या बहोत याने यशच्या कमरेवर चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांनाही मारहाण केली.
तर एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर उर्फ मुन्ना प्रताप खैरारिया (वय ३०, रा. लिंक रोड, चिंचवड), भरत मोहन बोहत (वय २०, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, यश उर्फ गुरु राजेश बोहत (वय २५, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल आहे. शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास फिर्यादी महिलेचा चुलत भाऊ आरोपी यश, त्याचा होणारा मेहुणा हे महिलेच्या घराबाहेर आले. त्याच्याकडे रॉड व दांडके होते. त्यांनी महिलेसह तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यांना समजावण्यासाठी महिलेची आजी गेली असता तिच्या डोक्यात बेदम मारून प्राणघातक हल्ला केला. तसेच महिलेच्या वडिलांना देखील मारहाण केली. यात त्यांना दुखापत झाली. पिंपरी पोलिस पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61761 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..