भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला तलवारीने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला तलवारीने मारहाण
भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला तलवारीने मारहाण

भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला तलवारीने मारहाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ : माजी नगरसेवकाच्या मुलाला माजी नगरसेवकाच्या मुलासह सहा जणांच्या टोळक्याने तलवारीने मारहाण केली. यामध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार चिंचवडगावातील भोई आळीमध्ये घडला.
प्रशांत नागेश आगज्ञान (वय ४४, रा. भोई आळी, चिंचवड) व त्याचा मित्र अक्षय सूर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सूरज हरिभाऊ तिकोणे (वय २७, रा. दत्तनगर, थेरगाव) याला अटक केली असून त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. प्रशांत भाजपचे माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचा मुलगा आहेत. तर सूरज माजी नगरसेवक हरिभाऊ तिकोणे यांचा मुलगा आहे. शनिवारी (ता. ७) थेरगाव येथे आरोपी व फिर्यादीमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग सूरजच्या मनात होता. दरम्यान, रविवारी (ता.८) रात्री साडे आठ वाजता प्रशांत हे भोई आळी येथे मित्रांसोबत गप्पा मारत असताना सूरज साथीदारांसह तेथे आला. शिवीगाळ करीत प्रशांत यांना तलवारीने मारहाण केली. तसेच अक्षय यांनाही मारहाण केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61780 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top