घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती गॅस सिलिंडरमधून 
गॅस भरणारा अटकेत
घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरणारा अटकेत

घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरणारा अटकेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : घरगुती गॅस सिलिंडरमधून इतर सिलिंडरमध्ये धोकादायकरीत्या गॅस भरणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. ही कारवाई हिंजवडी येथे करण्यात आली. अक्षय ज्ञानू कांबळे (वय २६, रा. गराडे वस्ती, माणगाव, मूळ-पंढरपूर, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा धोकादायकरीत्या इतर सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हिंजवडी, फेज दोन येथील बोडकेवाडीतील मुलाणी वस्ती येथे कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. येथून घरगुती वापराचे १३ मोठे गॅस सिलेंडर, लहान सिलिंडर, बारा पितळी रिफिलर, दोन लोखंडी पाइप, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण ४८ हजार २८ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61814 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top