ओबीसींच्या मागणीसाठी मुंबईत आज आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसींच्या मागणीसाठी
मुंबईत आज आंदोलन
ओबीसींच्या मागणीसाठी मुंबईत आज आंदोलन

ओबीसींच्या मागणीसाठी मुंबईत आज आंदोलन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः गोर बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी गोर सेनेच्या वतीने ११ मे रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा अध्यक्ष अजय राठोड यांनी केले आहे. या मोर्चाचे नेतृत्व गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण व राज्य प्रदेशाध्यक्ष प्रा. संपत चव्हाण हे करणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणीचे पत्र देण्यात येणार आहे. ओबीसींच्या जातीनिहाय जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्‍थांच्या निवडणुकीतील आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे, नॉनक्रिमियिरची अट रद्द करून सारथी, बार्टीच्या आधारावर ओबीसी व इतर सवलती देण्यात याव्यात.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61903 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top