उपायुक्तांना दोन महिन्यानंतर काम मिळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपायुक्तांना दोन महिन्यानंतर काम मिळाले
उपायुक्तांना दोन महिन्यानंतर काम मिळाले

उपायुक्तांना दोन महिन्यानंतर काम मिळाले

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्तांना दोन महिन्यानंतर काम मिळाले आहे. उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, विठ्ठल जोशी यांना जबाबदारी मिळाली आहे. महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी आदेश काढले आहेत. नगरविकास विभागाने तीन सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे.
महापालिकेत ३१ मार्च २०२२ रोजी उपजिल्हाधिकारी ढोले विठ्ठल जोशी यांची प्रतिनियुक्तीने बदली केली. चार एप्रिल रोजी ढोले, जोशी महापालिकेत रुजू झाले. त्यानंतर रुजू होऊन एक महिना झाला तरी उपायुक्तांना कामकाज दिले नव्हते. अखेरीस महिनाभरानंतर आयुक्तांनी उपायुक्त ढोले यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विषयक कामकाज आणि पशुवैद्यकीय विभाग तर उपायुक्त जोशी यांच्याकडे दक्षता व गुण नियंत्रण, माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागरी सुविधा केंद्राचा कार्यभार दिला आहे. तर उपायुक्त संदीप खोत यांच्याकडील आरोग्य विभाग काढून घेतला आहे.
तीन सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. यामध्ये सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून माहिती व जनसंपर्क, स्वच्छ सर्वेक्षण कामकाज समन्वयक हा पदभार दिला आहे. विनोद जळक यांच्याकडून स्वच्छ सर्वेक्षण कामकाज समन्वयक काढून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला आहे. सहायक आयुक्त वामन नेमाने यांच्याकडील जनसंपर्क विभाग काढून त्यांच्याकडे आता प्रशासन विभागाचे कामकाज कायम ठेवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61932 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top