ज्येष्ठ नागरिक संघांना मिळणार एलईडी टीव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक संघांना
मिळणार एलईडी टीव्ही
ज्येष्ठ नागरिक संघांना मिळणार एलईडी टीव्ही

ज्येष्ठ नागरिक संघांना मिळणार एलईडी टीव्ही

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः महापालिकेच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांसाठी ११६ एलईडी टीव्ही मोफत देण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ लाख ५० हजार खर्च महापालिका करणार आहे. देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांना एलईडी टीव्ही देण्यात येणार आहेत. शहरात तीन हजार ज्येष्ठ संघाची संख्या आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्या विभागाने मध्यवर्ती भांडार विभागास दिला होता. त्यासाठी दर मागविले होते. त्यात पुण्यातील मोनार्च टेक्नॉलॉजीजचा २१ हजार ९६० रुपये एका टीव्हीचा दर पात्र ठरला. हे ३२ इंच एलईडी टीव्ही आहेत. एकूण ११६ टीव्हीचा खर्च २५ लाख ५० इतका आहे. खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61935 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top