पिंपरी आणि आकुर्डीतील लोक न्यायालयात १ हजार २३२ प्रकरणे निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी आणि आकुर्डीतील लोक न्यायालयात १ हजार २३२ प्रकरणे निकाली
पिंपरी आणि आकुर्डीतील लोक न्यायालयात १ हजार २३२ प्रकरणे निकाली

पिंपरी आणि आकुर्डीतील लोक न्यायालयात १ हजार २३२ प्रकरणे निकाली

sakal_logo
By

लोक अदालत ः एक हजार २३२ प्रकरणे निकाली

साडेचार कोटी महसूल वसूल

पिंपरी, ता. १० ः पिंपरी आणि आकुर्डी येथील न्यायालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एक हजार २३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. पिंपरी-मोरवाडी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात विविध २३४ खटले निकाली काढण्यात आले. त्या माध्यमातून एक कोटी दोन लाख १३ हजार ६५० रुपये इतका महसूल जमा झाला.
आकुर्डी येथील न्यायालयात ९९८ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये तीन कोटी ५० लाख ५५ हजार ६२३ रुपये महसूल जमा झाला. अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुहास पडवळ होते. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. काळे, न्यायाधीश आर. एस. आर वानखेडे, न्यायाधीश आर. एम गिरी, न्यायाधीश पी. सी. फटाले, न्यायाधीश एन. टी. भोसले, न्यायाधीश एस. पी कुलकर्णी यांचा सत्कार पिंपरी -चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
लोक न्यायालयासाठी पॅनल अ‍ॅडव्होकेट म्हणून अ‍ॅड. पोर्णिमा मोहिते, गीतावली जाधव, सविता तोडकर, अश्‍विनी बंसल, शीला शुक्ला, अप्रशांत बचुटे, अमोल शिंदे, सचिन मोरे, ममता कांबळे, वृषाली धिवार, माधुरी तेलकर, काजल निकम यांनी पाहिले. स्वागत ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन थोपटे व कमिटीच्या वतीने करण्यात आले.
अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुनील कडुसकर, अ‍ॅड. देवदास शिंदे आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. निखिल बोडके यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव अ‍ॅड. सुनील रानवडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. थोपटे, गौरव वाळुंज, प्रियांका सुरवसे, सुनील रानवडे, अनिल पवार, गोरख मकासरे, मंगेश खरावे, संतोषी काळभोर, सारिका मोरे, ऐश्वर्या शिरसाट, स्नेहा कांबळे, महेश मासुळकर यांनी केले.


‘‘लोक न्यायालयामुळे लोकांना न्याय मिळतोय. सरकारच्या दंडाच्या रक्कमेतून महसूलदेखील मिळत आहे. महाराष्ट्रात पुणे न्यायालयाला पाच वेळा पहिला क्रमांक मिळविलेला आहे.’’
- ॲड. सचिन थोपटे, अध्यक्ष पिंपरी -चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशन

‘‘लोकन्यायालय अतिशय चांगली संकल्पना आहे. तडजोड पात्र प्रकरणे, खटले या माध्यमातून न्यायालयाच्या परवानगीने सोडविण्यात येतात. जलद न्याय मिळतो.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61937 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top