बांधकाम ना हरकत दाखला नावालाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम ना हरकत दाखला नावालाच!
बांधकाम ना हरकत दाखला नावालाच!

बांधकाम ना हरकत दाखला नावालाच!

sakal_logo
By

सुवर्णा गवारे-नवले
पिंपरी, ता. १० : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठी व्यावसायिक उद्यान विभागाकडून ना हरकत दाखला तर मिळवितात. वृक्ष लागवडीच्या नियमानुसार अनामत रक्कमही तत्परतेने भरतात. मात्र, झाडे लावण्याबाबत उदासीनता दाखवतात. परिणामी, झाडांसाठी ठेवलेली २०१६ पर्यंतची १७ कोटी अनामत रक्कम आत्तापर्यंत जप्त करण्यात आली आहे. ३२ कोटी रक्कम सध्या उद्यान विभागाकडे जमा झाली आहे.

इमारती उभारणी पर्यावरण व्यवस्थापन नियमन कायदा-२०२२च्या मसुद्याबाबतची अधिसूचना २८ फेब्रुवारीला पर्यावरण मंत्रालयाकडून जारी केली आहे. याबाबत लोकांच्या हरकती आणि सूचना देखील मागविल्या आहेत. यासाठी साठ दिवसांचा अवधी निश्चित करण्यात केला आहे. हे नियम नव्याने उभे राहणारे प्रकल्प आणि विस्तारीकरणालाही लागू आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या इमारतींची पुनर्बांधणी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांनाही हे नियम पाळावे लागू शकतात. साधारणपणे ज्या प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्र हे पाच हजार चौरस मीटरपेक्षाही अधिक आहे अशांना हा नियम पाळावा लागेल.
--
अशी आहे अधिसूचना
किमान ८० चौरस मीटरच्या परिसरामध्ये एक झाड लावणे गरजेचे असून भूखंडाचा दहा टक्के भाग हा झाडांनी व्यापला जावा. हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवूनच लागवड केलेल्या झाडांची गणना करण्यात येईल असेही या अधिसूचनेत नमूद केले आहे. इमारतींची उभारणी आणि नव्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने नियमांची पडताळणी करण्यासाठी आणि नवे नियम तयार करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने २९ जानेवारीला तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने सूचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी इमारती, रस्ते उभारले जाणार आहेत, जिथे पक्के बांधकाम केले जाणार आहे किंवा अन्य बाह्य सुविधांची उभारणी करण्यात येईल त्या जमिनीच्या पृष्ठभागावरील किमान २० सेंटीमीटर खोलीपर्यंतची माती काढण्यात यावी. हीच माती पुढे निश्चित अशा भागामध्ये साठविण्यात यावी. याच मातीचा पुढे वृक्षारोपणासाठी वापर करणे गरजेचे असल्याचे या अधिसूचनेत नमूद केले आहे.

कित्येक वेळा बांधकाम व्यावसायिक प्रकल्प हस्तांतरण झाल्यानंतर सोसायट्यांकडे जबाबदारी सोपवून रिकामे होतात. त्यामुळे, झाडे लावली तसेच, लावलेली झाडे जगली की, नाही याकडे सोसायटीधारकही कालांतराने लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत मोठ्या बिल्डरांकडून पर्यायाने मोठ्या प्रमाणात महसूल उद्यान विभागाला प्राप्त होतो.
---
कोट
वृक्ष लागवड बांधकाम ना हरकत दाखल्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, अनामत रकमेची मूळ पावती, अर्ज, साइट व्हिजिट व जगलेली झाडे यांचे पुरावे जमा केल्यानंतर अनामत रक्कम परत दिली जाते. कित्येकदा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक दुर्लक्ष करतात. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी लक्ष द्यायला हवे. मात्र, तसे होत नाही. ठरावीक मुदत आणि नोटीस पाठविल्यानंतर आम्ही ती रक्कम जप्त करतो.
- सुभाष इंगळे, उपायुक्त, उद्यान विभाग
---
जमा रक्कम : ३२,४०,५०,५००
जप्त रक्कम : १७ कोटी
---
वर्ष अनामत रक्कम
२०१५-१६ २,५३,९४.०००
२०१६-१७ २,५८,६३,०००
२०१७-१८ २,००,८९,०००
२०१८-१९ २,७०,७४,०००

२०१९-२० ४,७३,९०,५००
२०२०-२१ ४,५३,८४,०००
२०२१-२२ १३,२८,५६,०००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62056 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top