
पंडित शिवकुमार शर्मा यांना
पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली
पिंपरी, ता.१० ः पंडित शिवकुमार शर्मा यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांची प्राणज्योत मालवली. पंडित शिवकुमार शर्मा यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांनी संतूर या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय केले. जीवनभर कलेची सेवा करणाऱ्या या महान कलाकाराला, संगीतकाराला सन २०१२ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ११ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला. हे आमचे थोर भाग्य ! त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.
ते मला ‘नंदू'' म्हणायचे, - कपोते
-पंडित शिवकुमार शर्मा व माझे ३० वर्षांपासून संबंध होते. माझी व पंडित शर्मांची पहिली भेट ताश्कंद (रशिया) ला झाली. त्या वेळी मी पं. बिरजूमहाराज जीं समवेत नृत्य कार्यक्रमासाठी तेथे गेलो होतो. दोन दिवस आम्ही एकत्र होतो. पं. शर्माजींचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व विनोदी होता. त्यांनी माझे नृत्य पाहिले, कौतुक केले व आशीर्वाद दिले. तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या नंतर पं. शर्मांशी अनेक वेळा भेट झाली. ते मला ‘नंदू’ म्हणायचे. माझी शेवटची भेट पुण्याजवळ हाडशी येथे झाली. त्यावेळी तेथे सत्य साई बाबा आले होते व पं. शिवकुमार शर्मा त्यांच्या दर्शनासाठी आले होते. मलाही दर्शनासाठी आलेले पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी माझी आवर्जून विचारपूस केली मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. शर्मा यांनी संतूर या दुर्मिळ वाद्याला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक शिष्य तयार केले. शर्मा अकस्मित जाण्यामुळे कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कलाविश्व पोरके झाले आहे. कला क्षेत्रातील तेजःपुंज दैद्विप्यमान तारा निखळला आहे. ईश्वर पं. शिवकुमार शर्मा यांच्या आत्म्यास शांती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ज्या-ज्या वेळी संतूर वाद्याचे नाव निघेल, त्या-त्या वेळी पं.शिवकुमार शर्मा यांचे स्मरण होत राहील. शत शत नमन.
-डॉ. पं. नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध कथक नर्तक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62077 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..