माजी नगरसेवकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी नगरसेवकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण
माजी नगरसेवकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण

माजी नगरसेवकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : माजी नगरसेवकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी दुसऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवडगावातील भोई आळी येथे घडला. सूरज हरिभाऊ तिकोने (वय २७, रा. दत्तनगर, थेरगाव) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत आगज्ञान (रा. भोई आळी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल असून त्याचा साथीदार अक्षय सूर्यवंशी (वय २५) याला पोलिसांनी अटक केली आहे. सूरज माजी नगरसेवक हरिभाऊ तिकोने यांचा मुलगा आहेत. तर प्रशांत माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचा मुलगा आहे. शनिवारी (ता. ७) ऋषिकेश सावंत याच्याशी झालेल्या भांडणावरून रविवारी (ता.८) रात्री साडे आठच्या सुमारास प्रशांत याने सूरज यांना कोयत्याने मारहाण केली. तर अक्षयने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62123 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top