दोन तरण तलावांसाठी लागले १०९ खासगी टँकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन तरण तलावांसाठी लागले १०९ खासगी टँकर
दोन तरण तलावांसाठी लागले १०९ खासगी टँकर

दोन तरण तलावांसाठी लागले १०९ खासगी टँकर

sakal_logo
By

आशा साळवी-फर्नांडिस
पिंपरी, ता. १० ः महापालिकेचे पिंपळे गुरव आणि नेहरूनगर तरण तलाव भरण्यासाठी आतापर्यंत पाण्याचे १०९ खासगी टँकर लागले आहेत. उर्वरित ११ तलावांवर किती टॅंकर लागले, याची माहिती अद्याप गुलदस्त्‍यात आहेत. तलावातील पाण्यावर खर्च अफाट आणि उत्पन्न अत्यल्प अशी स्थिती आहे. गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दुसरीकडे पिंपळे गुरव तलावासाठी आजही दररोज एक टॅंकर येत असल्याची माहिती समोर आली आहे.

शहराच्या अनेक भागात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कूपनलिका, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आता पिण्याच्या पाण्याबरोबरच महापालिकेच्या तरण तलावासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्याअभावी अद्याप काही तरण तलाव अर्धवट भरल्याच्या स्थितीत आहेत. सद्यःस्थितीत एकेका तलावासाठी ४० ते ६० टँकर पाणी लागते. पण त्या तुलनेत तलाव भरण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिकेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पाण्यावर होणारा हा अवाढव्य खर्च पाहता लोकांनीच आता जलव्यवस्थापन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत या तरण तलावाचा आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, यंत्रसामग्री, दुरुस्ती आणि देखभालीवर होणारा खर्च हा जास्त असून वर्षागणिक त्यात वाढच होत चालली आहे.

पिंपळे गुरव तलावासाठी ६४ टँकर
शहरात सद्य:स्थितीत तलावासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. एका टँकरवर दररोज सरासरी २ हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी, आतापर्यंत दोन तलावांसाठी टँकरवर तब्बल २ लाख १२ हजार रुपये खर्च झाले आहेत. पिंपळे गुरव तरण तलाव सुरवातीला भरताना ६४ टॅंकर आले आहेत. आजही दररोज एक टॅंकर मागविला जातो. तर, अण्णासाहेब मगर नेहरूनगर तरण तलावात आतापर्यंत ४५ टँकर पाणी भरले आहे. अजूनही दोन फूट तलाव भरणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दररोज सरासरी २ हजार रुपये
या भागातील पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच टँकरचा खर्च सारखा नाही. जिल्हानिहाय तो वेगवेगळा आहे. पाण्याचे स्रोत किती दूर आहे, एक टँकर किती फेऱ्या मारते यावरही खर्चाचे मूल्यमापन अवलंबून आहे. शहरात २ रुपये प्रतिकिलोमीटर या दराने टँकरला खर्च दिला जातो. त्याचप्रमाणे ११८ रुपये प्रतिमेट्रिक टन या हिशेबाने पैसे दिले जातात. या सर्वांची सरासरी प्रति टँकर २ हजार रुपये एवढी येते.

सध्याची टँकरची स्थिती
1. नेहरूनगर तलाव - ४५ टँकर
२. पिंपळे गुरव तलाव - ६४ टँकर
३. पिंपळे गुरव तलाव - ६४ टँकर
४. पिंपरी वाघेरे तलाव- माहिती मिळाली नाही
५. निगडी तरण तलाव - माहिती मिळाली नाही
६. कासारवाडी तरण तलाव- माहिती मिळाली नाही

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62124 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top