
मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत
पिंपरी, ता. ११ ः मिलिंदनगर येथील पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत असलेल्या इमारतीमधील सदनिकांची संगणकीय सोडत आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते झाली.
चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयामध्ये कार्यक्रम झाला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सक्षम प्राधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, दत्तात्रेय रामगुडे, किशोर महाजन, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माजी नगर सेविका अरुण टाक, निकिता कदम यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘लाभार्थ्यांना घरे देण्याचा आनंदाचा क्षण आहे. चांगले घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रीया सुरू झाली आहे. पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना सदनिका दिल्या जातील. महापालिकेने सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी शांतता ठेवण्याबरोबरच तेथे स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने भूमिका पार पाडावी, सदनिकांच्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मूलभूत सुविधांसह घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या सदनिकांचा सुयोग्य वापर केला पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे.’’
११२ लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन (JNNURM) अंतर्गत केंद्रशासन, राज्यशासन, महापालिका आणि लाभार्थी झोपडपट्टीधारक यांच्या सहकार्याने मिलिंदनगर येथे पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या पाच इमारतींपैकी चार इमारतींमधील सदनिकांची वाटप यापूर्वी करण्यात आले असून सन २००२ च्या मशाल सर्वेक्षणानुसार ११२ लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात आले. या पात्र लाभार्थ्यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसह अंध, दिव्यांग, महिला यांचाही समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62127 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..