
भांडणाच्या रागातून एकाचा गळा आवळून खून
पिंपरी - दारू पिताना झालेल्या भांडणाचा (Fighting) राग मनात धरून एकाचा गळा आवळून खून (Murder) केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrested) केली आहे. ही घटना आळंदी येथे घडली. दीपक (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधव साबळे (वय ३०, रा. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी, मूळ- मु. पो. जांबअंध. ता. सेनगाव. जि. हिंगोली), सुधाकर ऊर्फ बंटी बबन वाघमारे (वय ३०, रा. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी, मूळ- हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय ५६, रा. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी , मूळ- मु. पो. हाडूलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नदी घाटावर जेवण करताना दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी दीपक यांना जबर मारहाण केली. त्यानंतर कशाच्या तरी साहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदी घाटाजवळील संत गुलाबराव महाराज ट्रस्ट शेजारील पदपथावर आढळला. हा प्रकार रविवारी (ता.८) साडे नऊ ते सोमवारी (ता. ९) सकाळी नऊ या कालवधीत घडला. दिघी पोलिसांनी आरोपींना चार तासातच अटक केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62143 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..