अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

‘बसवेश्वर अलौकिक
व्यक्तिमत्त्व ः नगरकर
पिंपरी, ता. ११ ः ‘‘मी लिंगायत आहे म्हणून मला बसवेश्वरांबद्दल विशेष प्रेम अथवा आदर आहे असे नाही. तर बसवेश्वर हे अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्यातूनच आपल्याला ही प्रचिती येते,’’ असे गौरवोद्गार सुनीता नगरकर यांनी निगडी येथे व्यक्त केले.
निगडी येथे लिंगायत माळी समाज संघ पुणे आणि जागतिक लिंगायत महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२२ साजरा करण्यात आला. ‘मला भावलेले बसवण्णा’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे समस्त लिंगायत समाजाचे आयोजक अप्पासाहेब वाले, अशोक नगरकर, बाळकृष्ण विसापुरे, चंद्रशेखर हुशनाळ, चंद्रकांत खोचरे, संगमेश्वर शिवपुजे, सिद्धरामेश नावदगिरे आदी उपस्थित होते. गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली.

‘जनसंवाद सभा कौतुकास्पद संकल्पना’
पिंपरी, ता. ११ ः प्रत्येक आठवड्यात दोन वेळा जनसंवाद सभा घेण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुस्लिमीन पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे. या बाबत त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटला आहे की, ‘जनसंवाद सभा ही अत्यंत कौतुकास्पद संकल्पना असून, या माध्यमातून शहरातील अनेक अडचणी नागरिकांना थेट मांडता येतात. त्यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होते. परंतु फक्त आठवड्यात सोमवारी सकाळी १० ते १२ दरम्यान घेण्यात येते. यामुळे अनेकांना वेळेअभावी जण संवाद सभेत सहभाग घेता येत नाही. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात आठवड्यात दोन वेळा सोमवारी सकाळी १० ते १२ दरम्यान व गुरुवारी सकाळी १० ते १२ दरम्यान जनसंवाद सभा घेण्यात यावेत.’’

‘कंत्राटी कामगार कल्याण मंडळाची स्वतंत्र स्थापना’
पिंपरी, ता. ११ ः कंत्राटी कामगारांना पण कामगार कायद्यानुसार सुविधा मिळणे गरजेचे आहे, परंतु त्यांना सर्व सुविधा आस्थापना मिळू देत नाहीत. केंद्राने कायम कामगार संकल्पना मोडीत काढली आहे. ‘कंत्राटी कामगार कल्याण मंडळाची स्वतंत्र स्थापना’ करावी, अशी मागणी गुणवंत कामगार शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे. निवेदनावर शहर महिला अध्यक्षा संजना करांजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, आळंदी शहर सचिव रवी भेंकी, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, अनेक उद्योजक व व्यवस्थापन कंत्राटी कामगारांवर अन्याय करत आहेत. कामगाराचे वेतन इतर आपस्थापनेला न देता स्वतःकडे मंडळाकडे घेऊन त्यांना भविष्य निर्वाह निधी, ई.एस .आय. सी इत्यादी सेवा आपल्या मंडळामार्फत पुरवाव्यात.’’

‘खोदलेले रस्ते दुरुस्त करावेत’
पिंपरी, ता. ११ ः शहरात पावसाळापूर्व कामे, नदीपात्रातील जलपर्णी काढणे, कामांसाठी खोदकाम केलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत यासाठी महापौर माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. ढोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, पुढील महिन्यांपासून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा पाऊस दहा दिवस आधीच केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याला लवकर सुरुवात झाल्यास नागरिकांची तारांबळ उडू नये म्हणून शहरात पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन शहरातील सर्व नाल्यांची सफाई तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपण तातडीने आदेश देऊन नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62249 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top