एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत 
महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड कासारवाडी येथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाना महाराष्ट्रमधून एकूण १९० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगावचे गहू गवित, यश धीरा माने, मादस्वी कांबळे, प्रसाद मोरे, अथर्व कावरे, नचिकेत अंधारे, अविनाश कडेकर, चैतन्य रेनोवा, रोहित नारखेडे, हर्षित तिवारी, सुजल काळे यांना सुवर्णपदक मिळाले. तसेच, हर्षल वाघमारे, शंभूराज काळे यांना रौप्य पदक व ओमकार नरळे याला ब्राँझ पदक मिळाले. स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक श्याम लांडे, नगरसेवक प्रसाद शेट्टी, मिलेनियम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पवार, राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग संघटना अध्यक्ष रवींद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष सुरेश कोळी, यशवंत माने यांनी केले. स्पर्धेमध्ये पंच म्हणून सागर कोळी, नीलेश जाधव, शंकर साबळे, संदीप माने, अरबाज सय्यद, गौतम प्रजापती, निखिल रेनोवा, अमन सय्यद, सौरभ माने, रोहित नारखेडे, प्रतीक लगड, गिरिजा म्हस्के, प्रशांत साबळे, करण बनसोडे, इरफान शेख यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62267 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top