
स्मारकाची दुरवस्था
सावित्रीमाई फुले भवनाची दुरवस्था
भाड्याच्या तुलनेत नागरिकांना सुविधा पुरविण्यात येत नाहीत
पिंपरी, ता. ११ ः अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी चौकात सावित्रीमाई फुले भवन तयार झाले. मात्र, अल्पावधीतच स्मारकाची दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे भवनासाठी घेतले जाणारे भाडे त्यातुलनेत महापालिकेकडून नागरिकांना सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे माहिती समोर आली आहे.
अथक पाठपुराव्यानंतर सावित्रीमाई फुले भवनाची उभारणी केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी अनेकजण या भवनाला पसंती देत आहेत. पण दोन ते तीन वर्षांतच स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारकाची रोजच्या रोज साफसफाई केली जात नाही. फरशी पुसली जात नाही. बाथरूम आणि शौचालय अस्वच्छ असतात, कार्यक्रमाच्या वेळी प्रचंड दुर्गंध येत आहे. शहरातील महापालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे, आचार्य अत्रे हे नाट्यगृह पाहता ते सुस्थितीत आणि स्वच्छ अवस्थेत आहे. त्यांची तुलना फुले स्मारकाची केल्यावर निश्चितच हे स्मारक अधिक बिकट अवस्थेत दिसून येत आहे. मोरे, अत्रे हॉलप्रमाणे स्मारकातील सांस्कृतिक हॉलमध्ये कायमस्वरूपी ध्वनीप्रणाली, प्रोजेक्टर, वातानुकूलित प्रणाली व इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तरीही भवनासाठी भरमसाट भाडे आकारले जात आहे. त्यातुलनेत सुविधांची वानवा आहे. परिणामी, नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
या आहेत तक्रारी व असुविधा
- स्मारकाची साफसफाई दररोज करण्यात यावी
- शौचालयामध्ये अनेक गोष्टी अपूर्ण आहेत
- विजेची सुविधा नाही या गोष्टीची तत्काळ पूर्तता करावी
- रामकृष्ण मोरे, आचार्य अत्रे हॉलप्रमाणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात
- हॉलमध्येच बाथरूम असल्यामुळे दुर्गंधीचा त्रास आहे
- हॉलमध्ये फ्रेशनेस राहावा याकरिता एअर फ्रेशनर, इतर साहित्य उपलब्ध करून देणे
- भवनाची वेळोवेवेळी काळजी घेऊन रंगरंगोटी, लिफ्ट मेंटेनन्स याची काळजी घेणे
- हॉलची अनामत रक्कम तीन हजार असून ती दीड हजार करण्यात करण्यात यावी
६३४९०, ९१, ९२
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62274 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..