भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः ‘मित्राची पत्नी व त्यांची मुलगा मोहननगरमधून दुचाकी वाहनावर चाललेले असताना त्यांचा तीन कुत्र्यांनी पाठलाग केला. ते दोघे जोरात रस्त्यावर खाली पडले. दोघांना जबर मार लागला. नशिबाने त्यांचे प्राण वाचले. मित्राच्या पत्नीचा हात व पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, ’ भटकी कुत्र्यांची वाढलेली दहशतीचा अनुभव सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी स्‍वरूपात मांडला आहे. नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मोहननगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर, साईबाबानगर, इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर आदी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव फार वाढला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोरात भुकंतात, त्यामुळे रात्री नागरिकांचा निद्रानाश होतो, लहान मुले दचकून घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले महिलांच्या अंगावर गुरगुरत धावून येतात, त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात रात्री पाळीला कंपनीत कामाला जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे ही कुत्री धावतात. त्यामुळे वाहने जोरात पळवावी लागतात. यामुळे यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. गंभीर प्रकरणी स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाय योजना राबविण्याबाबत सक्त आदेश द्या. वारंवार पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नाही. हे केवळ पशुवैद्यकीय विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62275 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top