
वल्लभनगर आगारातील चालक-वाहकांना मिळेना ड्युटी!
पिंपरी - संपात सहभागी झालेल्या वल्लभनगर आगारातील (Vallabhnagar Depot) कर्मचाऱ्यांना (Employee) नोकरीवर (Jobs) हजर होवूनही काम (Work) दिले जात नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. संप काळात पगार (Salary) मिळालेला नाही आणि आता काम नसल्याने वेतन नाही अशी आमची स्थिती झाली आहे, असे साऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत ‘सकाळ’ प्रतिनिधीजवळ व्यथा मांडताना कर्मचारी म्हणाले, ‘सध्या बस फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार, आगारातील काही कर्मचाऱ्यांना दररोज काम दिले जात आहे. मात्र, एखाद्याला रात्रपाळी दिल्यास पुन्हा त्यालाच दिवसपाळी दिली जाते. हा नाहक त्रास दिला जात असून आंदोलनातील कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. तर, काही जणांना कामच दिले जात नाही. नुकतेच एका चालकाला दापोलीच्या सलग फेऱ्या दिल्या गेल्या आहेत. यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना सलग दोन तीन दिवस काम दिले गेले नाही. असा दुजाभाव का? संप मागे घेतल्यानंतर २२ एप्रिलपासून आम्हा कामावर हजर झालो आहोत. रुजू झाल्यानंतर दहा दिवसांचा पगार मिळाला. मात्र, आता कामच दिले जात नसल्याने पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.’
असा आहे कामगार करार
कामगार करार १९९६ ते २००० मधील कलम क्रमांक ३५ अनुसार व १३ फेब्रुवारी २००९ च्या प्रसिद्धी पत्रकान्वये, १६ ऑक्टोबर १९९९ रोजी कामगार संघटनेच्या झालेल्या करारात नमूद करण्यात आले आहे की, जी प्रचलित पद्धत आहे तीच सुरु ठेवण्यात यावी. म्हणजे, जे वेतनश्रेणीवर आहेत. त्यांना ड्यूटी देण्यात यावी. तसेच, कामगारांना कामावर बोलविल्यानंतर कामावर हजर राहूनही काम न मिळाल्यास त्या दिवसाची त्यांची हजेरी लावण्यात यावी. मात्र, या अंमलबजावणीला आगाराने हरताळ फासला आहे. सध्या आगारातील सुमारे ८० टक्के कर्मचारी कामावर रुजू होवूनही त्यांना काम मिळत नसल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांना हजर राहूनही कामाचा मोबदला दिला जात नसून कराराचे उल्लंघन केले जात आहे.
यांना नाही दैनंदिन काम
चालक - २५
वाहक - ३५
एकूण : २१५
सध्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ड्युट्या दिल्या जात आहेत. काही कर्मचारी संपाच्या मानसिकतेतून अद्यापही बाहेर पडण्यास तयार नाहीत. एखाद्याने दांडी मारली असेल तर त्याचे पगार नाहीत. सर्वांचे पगार जमा झाले आहेत.
- गोविंद जाधव, स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62281 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..