देहूरोड येथे श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोड येथे श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
देहूरोड येथे श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

देहूरोड येथे श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

sakal_logo
By

देहूरोड, ता. ११ : देहूरोड बाजारपेठेतील सुदर्शन मंडळ, भागवत कथा सप्ताह समिती आणि भागवत कथा महिला मंडळाच्यावतीने येत्या १७ मे ते २४ मे पर्यत जया किशोरी यांचे संगीतमय श्रीमद्भागवत कथा व महायज्ञ सप्ताहाचे देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेच्या पटांगणावर आयोजन केले आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते रात्री साडेसात यावेळेत जया किशोरी कथा वाचन करणार आहेत.
मंगळवारी (ता.१७) कलश पूजन आणि कलश यात्रेचे आयोजन केले. बुधवारी(ता.१८) नारद- भक्ती वार्तालाप, गोकर्ण कथा, भागवत कथा महात्म सांगणार आहे. गुरुवारी(ता.१९) माता अनुसया कथा, वराह अवतार, शिवपार्वती विवाह, शुक्रवारी (ता.२०) जड भरत कथा, अजामिल कथा, प्रल्हाद चरित्र, शनिवार(ता.२१) धर्म कथा, समुद्र मंथन, श्रीरामजन्म, श्रीकृष्णोत्सव, रविवारी(ता.२२) श्रीकृष्ण बाललिला, गोवर्धन पूजा, छप्पन भोग, सोमवारी(ता.२३) कंसाचा वध, रासलीला, गोपी उद्धव संवाद, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह, मंगळवारी(ता.२४) श्रीकृष्ण अनन्न विवाह, सुदामा चरित्र, महाभारत कथा, राजा परिक्षिताचा मोक्ष आणि कथा विराम होणार आहे, अशी माहिती कथा अध्यक्ष कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62283 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top