राजारामनगर ते रावेतपर्यत १३४ मीटरचा रस्ता करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजारामनगर ते रावेतपर्यत 
१३४ मीटरचा रस्ता करा
राजारामनगर ते रावेतपर्यत १३४ मीटरचा रस्ता करा

राजारामनगर ते रावेतपर्यत १३४ मीटरचा रस्ता करा

sakal_logo
By

देहूरोड, ता. ११ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेने राजारामनगर ते रावेत हद्दीपर्यंत १३४ मीटरचा रस्ता तयार करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड कॅाग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भोसले यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत किवळे गाव समाविष्ट होण्यापूर्वी या भागातील पुणे-मुंबई रेल्वे हद्दीनंतर एम. बी. कॅम्प, बापदेवनगर, साळुंके वसाहत, श्रीनगर, जुनावणे विटभट्टी, राजारामनगर या भागात किवळे ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने छोट्या-छोट्या भूखंडावर बांधकामे झालेली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत किवळे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रारूप विकास योजनेतील नकाशात पुणे - मुंबई रेल्वे हद्दीनंतर दापोडी ते भेगडेवाडी पर्यंत २५ मीटर रुंद रेल्वेसाठी वाहतूक दळण झोंनिग प्रस्तावित केले आहे. दापोडी ते भेगडेवाडी पर्यंत रेल्वे हद्दीनंतर दोन ते २५ फुटानंतर बांधकामे झाली असून, जागा उपलब्ध नाही. रेल्वे विभागाने त्यांची हद्द कायम करून संरक्षक भिंत रावेत हद्दी पर्यंत बांधली आहे. रेल्वे हद्दीनंतर देहूरोड येथील एम. बी. कॅम्प ते जुनावणे विटभट्टीपर्यंत १००० मीटर महानगर पालिकेने २५ ते ३० फुटी रस्त्याचे डांबरीकरण करून वृक्षारोपण केले आहे. पुढील राजारामनगर ते रावेत हद्दीतील बी. आर. टी रस्त्यापर्यंत १३४ मीटर रस्ता तयार केला नाही. हा रस्ता तयार करावा याकरीता २००२ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे.
महापालिकेत वाहतूक दळणवळण रद्द करण्याबाबत झालेल्या ठरावानुसार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या शिफारशीनुसार दापोडी ते भेगडेवाडी ते वाढीव प्रारूप विकास योजनेतील वाहतूक दळण वळण झोंनिंग रद्द करून नागरिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार काढावी, अशी मागणी श्याम भोसले यांनी महापालिका व सरकारकडे निवेदनात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62293 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top