कल्याणकारी योजनांमध्ये प्रशासकांकडून बदल व सुधारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणकारी योजनांमध्ये प्रशासकांकडून बदल व सुधारणा
कल्याणकारी योजनांमध्ये प्रशासकांकडून बदल व सुधारणा

कल्याणकारी योजनांमध्ये प्रशासकांकडून बदल व सुधारणा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः महापालिकेच्या वतीने महिला, मागासवर्गीय, निराधार, अनाथ बालके आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विविध कल्याणकारी अशा एकूण ३४ योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांमध्ये कालानुरूप बदल व सुधारणा केल्या आहेत. सहा योजना नव्याने सुरू केल्या असून, सात योजना रद्द केल्या आहेत, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘नवीन योजनेमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या युवक व युवतींना विविध प्रशिक्षण देण्याची आहे. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांच्या महिला बचत गटांना अनुदान दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांना दरमहा तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे. महिला बचत गटांना अनुदान दिले जाणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. आता ते बक्षीस इतर खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही. प्रतिसाद नसल्याने मागासवगीय गृहनिर्माण योजना रद्द केली आहे. दोन मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबास मदत ही योजना रद्द केली आहे. महापालिकेच्या वायसीएम व इतर रुग्णालयात प्रसूती होणाऱ्या शहराबाहेरील महिलांनाही पालिका मदत देणार आहे. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्यांना दिलेली जाणारी शिष्यवृत्ती दोनऐवजी विविध अभ्यासक्रमांना देण्यात येणार आहे.’’
महापालिकेच्या कल्याणकारी योजनांबाबत टाटा स्ट्राईव्ह कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यांनी पुढील पाच वर्षांचा व्हीजन अहवाल दिला आहे. त्यानुसार पालिकेने जुन्या व प्रतिसाद नसलेल्या योजना बंद केल्या आहेत. काही योजनांमध्ये कालानुरूप बदल केले आहेत. काही नव्या योजनांचा समावेश केला आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62294 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top