
अतिक्रमणविरोधी पथकाची थरमॅक्स चौकात कारवाई
पिंपरी, ता. १ ः आकुर्डी येथील थरमॅक्स चौकात अतिक्रमणविरोधी पथकाने धडक मोहीम राबविली. टपऱ्या हातगाड्यांसह, अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेली बांधकामे जमीनदोस्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून हे टपरीधारक, हातगाडीधारक व्यवसाय करीत होते. या चौकातून चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी जाणाऱ्या कामगार वर्गाची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे या चौकात बस, मालवाहतूक करणारे ट्रक आदी वाहनांची तसेच पायी चालणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. परिणामी रस्त्याचा हा मार्ग वाहनचालकांसाठी व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला होता. येथील मार्गावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निगडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62296 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..