गहुंजे रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गहुंजे रस्त्याची दुरवस्था
गहुंजे रस्त्याची दुरवस्था

गहुंजे रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १२ ः रस्त्यावरून वाहणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे गहुंजे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. वाहनचालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असल्याने प्रशासनाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गहुंजे ग्रामस्थांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी अडीच किलोमीटर लांबीच्या गहुंजे ते शिरगाव रस्त्याच्या खडी डांबरीकरणाचे
काम पूर्ण करण्यात आले होते. नियमानुसार सन २०२४ पर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबबादरी संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. या रस्त्याच्या खडी डांबरीकरणाचे काम करताना संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांचे सांडपाणी रस्त्यावरून वाहणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते, मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने पाणी रस्त्यावर साठत आहे.
दुचाकीस्वारांना खड्डे चुकवतच या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत असल्याने अपघाताचा धोका संभवत आहे.
------------
गहुंजे ः गटारातील पाण्यामुळे शिरगाव गहुंजे रस्त्याची झालेली दुरवस्था.
(६३४७६)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62298 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top