विविध विकासकामांना महापालिका प्रशासकांची मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध विकासकामांना महापालिका प्रशासकांची मंजुरी
विविध विकासकामांना महापालिका प्रशासकांची मंजुरी

विविध विकासकामांना महापालिका प्रशासकांची मंजुरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः महापालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम व नेमणुकीची पध्दत आणि टक्केवारी यामध्ये नामनिर्देशनाने ७५ टक्के तर पदोन्नतीने २५ टक्के यानुसार प्रमाण निश्चित करण्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक झाली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक पाटील यांच्या निर्णयासाठी बैठकीत ठेवले होते. बैठकीला विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

इतर निर्णय असे ः
- शहरातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जातात. यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ‘पीएमपीएमएल’ला ३२ लाख ७७ हजार रुपये अदा
- कोकणे चौकातील आणि थेरगाव येथे नव्याने विकसित केलेले मध्यदुभाजक सुशोभीकरण देखभालीसाठी ५ लाख ५७ हजार रुपये खर्चास मंजुरी
- महापालिकेचे निघोजे-तळवडे येथील नियोजित अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली येथील प्रकल्पांना उच्चदाब वीजपुरवठा घेण्यासाठी, विद्युत विषयक कामांतर्गत चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करण्यासाठी २२ केव्ही वीजवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक ९ कोटी ३२ लाख ६ हजार रुपये खर्चास मंजुरी
- प्रभाग क्रमांक २१ मधील नव्याने होत असलेल्या रस्त्यावर दिवाबत्ती व्यवस्था करण्यासाठी ३४ लाख
- प्रभाग क्रमांक १८ मध्ये उंच पाण्याची टाकी बांधण्यासाठी ३ कोटी ११ लाख ८८ हजार रुपये
- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेसाठी विविध विभागाच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पुस्तकांची खरेदी करण्यासाठी १७ लाख ६५ हजार रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62299 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top