तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन
तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन

तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः ज्येष्ठ तृतीयपंथीयांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्तिवेतन सुरु करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. सामाजिक क्रांतीचे असे पाऊल उचलणारी देशातील ही पहिली महापालिका ठरली आहे. शिवाय महापालिकेच्या उद्यानांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम मिळणार आहे.

तृतीयपंथी घटक बऱ्यापैकी समाजावर अवलंबून असतो. अशावेळी समाजाने त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत. आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकाने उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांप्रती सामाजिक जाणिवेतून काम केले पाहिजे. महापालिका या कल्याणकारी कामासाठी पुढाकार घेत असून या समूहाला मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहेत. तृतीयपंथीयांना बऱ्याचदा उतारवयात हलाखीचे जीवन जगावे लागते. त्यामुळे ५० वर्षे पूर्ण झालेल्या रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्यात येणार आहे. ही तृतीयपंथी पेन्शन योजना असल्याचे प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62306 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top