नगररचना योजनेतील प्रॉपर्टी कार्ड वाटप सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचना योजनेतील प्रॉपर्टी कार्ड वाटप सुरू
नगररचना योजनेतील प्रॉपर्टी कार्ड वाटप सुरू

नगररचना योजनेतील प्रॉपर्टी कार्ड वाटप सुरू

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : म्हाळुंगे येथे २९ मार्च २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी मिळकत पत्रिका तयार करून त्याचे चावडी वाचन करण्याचे आदेश दिले होते. या योजनेतील सहभागी खातेदारांसाठी नवीन मिळकत पत्रिका तयार करून त्याचे चावडी वाचन ११ मे २०२२ रोजी महाळुंगे येथे करण्यात आले. १५० मिळकत पत्रिका तयार करून त्याची कच्ची प्रत अंतिम भूखंड धारकांना वाटप करण्यात आले. काही त्रुटी किंवा चुका असल्यास त्या तपासून शेतकऱ्यांनी आठ दिवसांत प्राधिकरणास किंवा भूमी अभिलेख विभागास कळवावे, असे उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62491 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top