
एकसमान आकार व डिझाईनचे होर्डिंग लावणार
पिंपरी, ता. १२ ः शहरात नवे बाह्य जाहिरात धोरण राबविण्यास सत्ताधारी भाजपने नकार दिला होता. मात्र, प्रशासकीय राजवटीत त्या धोरणास विधी समिती व सर्वसाधारण सभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली. परिणामी, शहरात पुढील सहा ते सात महिन्यांत केवळ महापालिकेच्या मालकीचे एकसमान आकाराचे व सजावटीचे होर्डिंग दिसणार आहेत.
जगातील विविध देशाचा अभ्यास करून जाहिरात होर्डिंग धोरण निश्चित करण्यात आले. ते एकसमान होर्डिंग निविदा काढून एजन्सीला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. होर्डिंगसंदर्भातील नव्या संकल्पनेसाठी पालिकेने स्पर्धाही घेतली आहे. त्यातील योग्य संकल्पनेचा नव्या धोरणात अवलंब केला जाणार आहे, या संदर्भात आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खासगी जागेत पालिकेच्या अटी व शर्तीनुसार होर्डिंग उभारणे बंधनकारक असणार आहे. त्याचा आकार व डिझाईन पालिका निश्चित करणार आहे. नियमात असलेल्या होर्डिंगला पालिका परवानगी देणार आहे. या माध्यमातून पालिकेचे उत्पन्नात मोठी भर पडणार आहे, असा दावा आयुक्तांनी केला.
‘‘नव्या धोरणानुसार शहरात कोठेही कोणालाही जाहिरात होर्डिंग लावता येणार आहे. यापुढे केवळ महापालिका स्वतः होर्डिंग उभारणार आहे. शहरात अत्याधुनिक पद्धतीचे २० फूट बाय ४० फूट, २० फूट बाय २० फूट आणि २० फूट बाय १५ फूट अशा एकसमान आकार व डिझाईनचे सुमारे ५०० होर्डिंग लावण्याचे नियोजन आहे. त्या-त्या भागानुसार चालू बाजारभावानुसार होर्डिंगचा दर आहे. अंधारातही ते होर्डिंग स्पष्टपणे दिसणार आहेत.’’
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62639 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..