
भोसरीत टोळक्याची विक्रेत्याला मारहाण
पिंपरी, ता. १२ : पाच जणांच्या टोळक्याने खाद्यपदार्थ विक्रेत्या दोन भावांना मारहाण केली. ही घटना भोसरीतील भाजी मंडई व्यापारी संकुलात घडली. किरण गजानन फुगे, मनोज अशोक परदेशी, भानुदास बबन लांडगे, महेश बबन लांडगे, गजानन काळुराम फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ईश्वर भगवान बोऱ्हाडे (रा. गुरुदत्त कॉलनी, गवळीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता. ९) सायंकाळी सव्वापाच वाजता आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानात बेकायदा शिरले. किरणने दांडके घेऊन ईश्वर व त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर यांना मारहाण केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत दुकानातील काउंटर ढकलून देऊन खाद्य पदार्थांचे नुकसान केले.
कंपनीतून सव्वासात लाखांची चोरी
कंपनीच्या सिमाभिंतीचा पत्रा कापून आत शिरलेल्या चोरट्यांनी सात लाख २४ हजारांचे साहित्य चोरले. ही घटना देहूगावमधील विठ्ठलवाडी येथे घडली. या प्रकरणी गणेश हणमंतराव निकम (रा. सिल्व्हर नाईन सोसायटी, मोशी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची विठ्ठलवाडी येथे ट्रिओ इंजिनिअरिंग ही कंपनी असून चोरटे कंपनीच्या सिमाभिंतीचा पत्रा कापून कंपनीत शिरले. चार लाख ५४ हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक केबल, दीड लाखांच्या जुन्या केबल, टीव्ही, दोन लॅपटॉप, एक डीव्हीआर, दोन एलजी कंपनीचे डेस्कटॉप मॉनिटर असा एकूण ७ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महिलेचे फेक अकाउंटवर बनविले व्हिडिओ
फेक अकाऊंट बनवत त्यावर महिलेचे फोटो वापरून व्हिडिओ तयार करीत व्हिडिओ महिलेला पाठवला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवले. त्यावर फिर्यादी महिलेचे फोटो वापरून व्हिडिओ तयार केला व तो महिलेला पाठवला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना चिंचवड येथे घडली. लक्ष्मण संजय क्षीरसागर (वय १८, रा. चिंचवड), रोहित रमेश सुतार (वय २१, रा. वाल्हेकरवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीची बारा वर्षीय मुलगी नातेवाईकाच्या घरी पिठाचा डबा देण्यासाठी गेली होती. डबा देऊन घरी येत असताना लक्ष्मणने तिला आरोपी रोहित याच्या खोलीत उचलून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रोहितनेही पीडित मुलीवर अत्याचार केला. नऊ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता पीडित मुलगी घराच्या परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडत असताना आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62686 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..