तरण तलाव बंद करण्याची ओढवली नामुष्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरण तलाव बंद करण्याची ओढवली  नामुष्की
तरण तलाव बंद करण्याची ओढवली नामुष्की

तरण तलाव बंद करण्याची ओढवली नामुष्की

sakal_logo
By

क्रीडा विभाग ः पाण्याची टंचाई आणि तरतुदीचा अभावाच्या कात्रीत

दुरुस्तीसाठी चार तलाव बंद

पिंपरी, ता. १३ ः पाण्याची टंचाई आणि देखभाल दुरूस्तीसाठीच्या तरतुदीचा अभाव अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या क्रीडा विभागाला देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील चार तरण तलाव बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. परिणामी, ‘स्‍थापत्यविषयक कामे’ सुरू असल्याची पाटी केवळ तरण तलावाच्या दर्शनी भागावर नावालाच झळकत असल्याचे सत्य उघडकीस आले आहे.

कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षे १३ तरण तलाव बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्य सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात क्रीडा प्रकारांसाठी निर्बंधही शिथिल केले होते. तेव्हापासून जलतरणपटूंसाठी क्रीडा संकुलातील तरणतलाव सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. विद्यार्थी घरात बसून एकलकोंडे झाले असून त्यांना मैदानी खेळ, छंद जोपासता यावेत, यासाठी क्रीडा संकुले, तरणतलाव सुरू करावे, अशी मागणी पालकांची होती. उन्हाळ्याच्या सुटीत वाजवी दरात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी चिमुकले उत्सुक होते. पण दुरुस्तीच्या नावाखाली चार तरण तलाव बंद अवस्थेत आहेत. तसेच सांगवीच्या तलावाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत तरण तलावाची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीसाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुरुस्तीसाठी निविदा काढली नाही
कोरोना कालावधीत सलग दोन वर्षे तरण तलाव बंद होते. महापालिकेच्या अनेक तलावांचे फिल्टरेशन प्लांट नादुरुस्त झाले आहेत. काहींची खोली कमी करायची आहे. मात्र, क्रीडा विभागाकडे पुरेशी तरतूद नसल्याने या कामाची निविदा प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली केशवनगर, भोसरी, मोहननगर, थेरगाव आदी तलाव बंदच आहेत.

या तलावांची खोली कमी करायची
चिंचवड-केशवनगर तलावाची तीन मीटर खोली कमी करायची आहे. भोसरी, मोहननगर-चिंचवड स्टेशन, आणि थेरगाव या तलावांची खोली जास्त आहे. त्यामुळे या तलावांची दहा फुटापर्यंत खोली कमी करायची आहे. दुरुस्तीचे काम असल्याने ते चार तलाव बंदच राहणार आहेत. तर नेहरूनगर, संभाजीनगर, यमुनानगर तलावांत अद्याप पाणी पूर्ण भरलेले नाही. तसेच सांगवीच्या तलावाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे

ऐन हंगामातच उत्पन्नावर गदा
एप्रिल व मे हे दोन महिने उत्पन्न वाढवण्यासाठी अधिक योग्य असताना ऐन हंगामातच पाणीपुरवठा होत नसल्याने तरण तलाव बंद आहेत. त्यामुळे उत्पन्नावर त्याचा निश्चितच परिणाम होत आहे. पाणी पुरवठ्याच्या टंचाईमुळे यापूर्वीही तलाव बंद ठेवण्यात आलेले आहेत. तरण तलावावर आजीव सभासद, वार्षिक सभासद, त्रैमासिक सभासद, कौटुंबिक सभासद, मासिक सभासद असे नियमित जलतरणासाठी येत असतात. पण तलावच बंद असल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली आहे. जे सुरू आहेत, असे जलतरण तलाव किती दिवस चालू शकेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

22S63487, PNE22S63488

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62749 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top