
जुन्या आठवणींनी ३५ वर्षांनी मिळाला उजाळा
देहूरोड, ता. १२ ः शाळेच्या घंटेचा आवाज... विद्यार्थ्यांचा गजबजाट... शिक्षकांचे तासावर येणे आणि शाळेच्या आवारातील खोडसाळपणा... अशा अनेकविध गोष्टींचा अनुभव सुमारे ३५ वर्षांनंतर देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला. या शाळेतील १९८७ च्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्नेहमेळाव्यानिमित्ताने एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी विद्यार्थिदशेतील अनुभवांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी गुरुवंदनेसह सर्व गुरूजनांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येकाने आपली ताकद ओळखून स्वतःची व समाजाची प्रगती साधली पाहिजे. पैशाच्या मागे न धावता आत्मिक समाधान महत्वाचे असल्याचे माजी मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांनी नमूद केले, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले, मात्र आजवरच्या जीवनातील यशाचे श्रेय शिक्षकांनाच जात असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.
विद्यार्थी दीपक पवार, अविनाश कांबळे, मंजूषा कार्यकर्ते, महेश गायकवाड, मंगेश भोसले, सतिश जगताप, दिनकर राऊत, गणेश राऊत, भीमराव राक्षे, संजय गंगावणे, संतोष गंगावणे, विकास आगळे, महेश मांजरे, सदाशिव भोईर, नितीन खानेकर, अविनाश कांबळे, रमेश फडतरे, शिवाजी शिक्रे, सुनीता सुतार, हेमलता कुंभार, सुरेखा काळोखे, संगीता कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले.
शाळेला उपयुक्त असणारे खुर्च्या, टेबल व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.
----------------------
कार्ला ः स्नेहमेळाव्यात सहभागी झालेली शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व गुरुजन.
(फोटो- ६३७५९)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62808 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..