
वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा आराखडा करा - संजय असवले
देहू - ‘संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पालखी प्रस्थान सोहळ्याला (Palkhi Sohala) सुमारे पंचवीस टक्क्यांनी भाविकांची (Devotees) संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा (Plan) तयार करा,’ अशा सूचना हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले (Sanjay Aswale) यांनी देहूतील पालखी सोहळ्याच्या आढावा बैठकीत दिला.
आषाढी वारीसाठी सोहळ्याचे २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर देऊळवाड्यात प्रांताधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, नगरपंचायत गटनेते योगेश परंडवाल, सदस्य योगेश काळोखे, पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील व विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
बस व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, पालखी सोहळ्यात पिण्याचे पाण्याचे टॅंकर, विद्युत व्यवस्था, अनगडशावलीबाबा दर्गा येथील आरती, नगरपंचायतीचे व्यवस्थापन आणि स्वच्छता, वाहतूक नियंत्रक पोलिस व्यवस्था याबाबत चर्चा झाली.
‘पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी तळ करावा’
‘आषाढी वारीतील प्रत्येक मार्गावर सरकारने पालखी तळ केलेला आहे. मात्र, देहू ते पिंपरी-चिंचवड येथे पालखी तळ सरकारने भविष्यात करावा. याबाबत विचार करावा. पालखी मार्गावर देहू ते आकुर्डी दरम्यान पिण्याच्या पाण्याचे टॅंकरची व्यवस्था करावी,’ असे संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62873 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..