
हुंड्यासाठी विवाहितेचा खून करून रचला बनाव
पिंपरी, ता. १३ : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा खून केला. त्यानंतर खुनाचा सुगावा न लागण्यासाठी अपघाताचा बनाव केला. हा प्रकार २६ मार्च रोजी कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडला. अंजली अंकित शर्मा (वय ३०, रा. भापकर प्लाझा बिल्डिंग, शास्त्रीनगर, कासारवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती अंकित राजेश शर्मा, सासरा राजेश शर्मा, सासू व दिर (सर्व रा. कासारवाडी ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ईश्वरचंद जगदीशचंद्र यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंजली व आरोपी अंकित यांचा विवाह झाल्यानंतर अंकित व त्याच्या घरच्यांनी त्यांच्याकडे हुंड्याची मागणी केली. त्यांना त्रास दिला. हुंड्यासाठी कटकारस्थान व षडयंत्र रचून आरोपींनी अंजलीला पुण्यात घेऊन गेले. तिथे त्यांचा खून केला. या खुनाचा सुगावा लागू नये यासाठी अपघात झाल्याचा बनाव केला. हा प्रकार २६ मार्च २०२२ ला कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळील किलोमीटर क्रमांक १८१/०३ च्या जवळ घडला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62890 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..