अश्लील फोटो न पाठवल्याने सीईओकडून महिलेची बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
अश्लील फोटो न पाठवल्याने सीईओकडून महिलेची बदली

अश्लील फोटो न पाठवल्याने सीईओकडून महिलेची बदली

पिंपरी - शोरूमच्या सीईओने कामगार महिलेला अश्लील फोटो पाठवण्यास सांगितले. महिलेने फोटो न पाठवल्याने सीईओने तिची दुसऱ्या शाखेत बदली केली. हा धक्कादायक प्रकार वाकड येथील मायकार शो-रूम येथे घडला. एस. ए. पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या सीईओचे नाव आहे. या प्रकरणी पीडित कामगार महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला अश्लील फोटो पाठवण्याची वारंवार मागणी केली.

महिलेने आरोपीच्या मागणीला विरोध केल्याने तिची बदली चाकण येथील शो-रूममध्ये केली. त्याचा जाब विचारण्यासाठी महिला वाकड येथील शो-रूममध्ये गेली असता त्यांना मानसिक त्रास दिला. यात त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62896 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top