
गॅस सिलिंडरचा म्हाळुंगे, मारुंजीत काळाबाजार
पिंपरी, ता. १२ : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक केली.
म्हाळुंगे येथे मंगळवारी (ता. १०) केलेल्या कारवाईत प्रकाश ऊर्फ चंदन सरबेज प्रजापती (वय २०, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) याला अटक केली. आरोपीने एका पत्र्याच्या खोलीत घरगुती वापराचा गॅस मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये भरला. ते सिलिंडर जादा दराने विकले. सिलिंडर अवैधरीत्या विकण्यासह साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याच्या ताब्यातून गॅस सिलिंडर , इलेक्ट्रॉनिक वजन काटा, रिफील पीन असा सात हजार ६८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
तर मारुंजी येथे केलेल्या दुसऱ्या कारवाईत बिरू हरिबा दुधाळ (वय २८, रा. मारुंजी) याला पोलिसांनी अटक केली. देविदास चिंधू बुचडे तसेच गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या कस्पटे एजन्सीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी बिरू याने मोठ्या सिलेंडररमधून छोट्या सिलिंडरमध्ये चोरून गॅस काढला. हे गॅस सिलिंडर विनापरवाना लोकांना विकले. तर आरोपी देविदास व कस्पटे गॅस एजन्सीने त्याला सिलिंडर पुरवले. आरोपीकडून दोन टेम्पो, एक लाख रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62926 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..