भोसरी, रावेत, मोशी, पिंपळे गुरव परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईचा धडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment
भोसरी, रावेत, मोशी, पिंपळे गुरव परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईचा धडाका

भोसरी, रावेत, मोशी, पिंपळे गुरव परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईचा धडाका

पिंपरी - महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. या पथकाकडून भोसरी, रावेत, मोशी, पिंपळे गुरव परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली.

यात पहिली कारवाई 'क' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी ते पांजरपोळ पर्यंत ६१ मीटर रस्ता रूंदीतील दुतर्फा अतिक्रमणे निष्कासीत करण्यात आली. प्रभाग क्रमांक ६ व ९ येथे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने कारवाईमध्ये १२५ (पत्राशेड / बांधकामे) अंदाजे क्षेत्रफळ ८३३०.०० चौ. मी. (८९६३० चौ. फूट) अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. स्थापत्य विभागाकडील जेसीबी ४, लेबर-१०, 'फ' स्थापत्य विभागाकडील जेसीबी-३, लेबर-१०, डंपर-४, गॅस कटर-१, क्रेन - १, मजूर-१५ आदींनी कारवाई केली.

‘ब' क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पवना नदी पत्रातील जाधवघाट रावेत येथील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई केली. या कारवाईमध्ये १९ पत्राशेड असे एकूण अंदाजे ४११९ चौरस मीटर अनधिकृत निष्कासित केली. ६ मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलिस स्टेशन ५ पोलिस उपनिरीक्षक, २१ पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील १ आर. सी. पी., प्लॅटून (१५ पोलिस कर्मचारी) महाराष्ट्र पोलिस सुरक्षादल ५४ कर्मचारी, ६ जेसीबी २ क्रेन तसेच २० मजूर यांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

‘ई' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे नाशिक ६१ मीटर दुतर्फा रस्तामधील पहिल्या टप्प्यातील प्रभाग क्रमांक ३ मौजे मोशी (मोशी टोलनाका ते बनकर वस्ती) येथील कारवाईत ४५ (पत्राशेड / वीट बांधकामे / आर.सी.सी.) अंदाजे क्षेत्रफळ ४५,००० चौ. फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

'ड' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ येथील कारवाईमध्ये ४२ (पत्राशेड / बांधकामे) अंदाजे क्षेत्रफळ (६७००० चौ. फूट) अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच महापालिका कर्मचारी ८, सांगवी पोलिस स्टेशन कडील पोलिस निरीक्षक - १ पोलिस उपनिरीक्षक - १, इतर पोलिस कर्मचारी - १५ तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ७० सुरक्षा रक्षक, विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 'ड' स्थापत्य विभागाकडील जेसीबी - २, लेबर - १०, 'ग' स्थापत्य विभागाकडील जेसीबी - २, लेबर - १०, गॅस कटर - १, मजूर - २० आदींनी कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63004 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top