
कुस्ती स्पर्धेसाठी दुभती जनावरे बक्षीस
सोमाटणे, ता.१३ ः दारुंब्रे येथील उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात विजेत्या स्पर्धकाला दुभती जनावरे भेट देण्याचा ग्रामस्थांनी अनोखा उपक्रम केला.
ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराज व वाघजाई माता उत्सवानिमित्त दारुंब्रे येथे आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यातील विजेत्या स्पर्धक पैलवानाला चांदीची गदा, रोख बक्षीसाबरोबरच माजी सरपंच राजेश वाघोले यांच्या वतीने प्रथम क्रमांकास एक लाख रुपये किमतीची म्हैस व उर्वरित पाच क्रमांकास प्रत्येकी एक बकरी, असे बक्षीसे ठेवली होती. कुस्तीत विजेत्या स्पर्धकाला दुभती जनावरे बक्षीस देण्याचा असा आगळा वेगळा आखाडा दारुंब्रेमध्ये प्रथमच भरविला होता, त्यामुळे नेहमीपेक्षा यावर्षी दुप्पट पैलवानांनी कुस्तीत सहभाग घेतला. या कुस्ती आखाड्यात पहिले मानाचे बक्षीस सांगवडे येथील नागेश राक्षे यांनी पटकावले, त्यांना एक लाखाची म्हैस, चांदीची गदा व रोख पारितोषिक दिले. उर्वरित दोन ते पाच क्रमांकांच्या पैलवानास रोख बक्षीसाबरोबर एक बकरी दिली.
याचे वितरण माजी सरपंच राजेश वाघोले, राकेश सोरटे, दिलीप राक्षे, मनोज येवले, लक्ष्मणराव शितोळे, गुलाबराव वाघोले, सरपंच उमेश आगळे, शांताराम वाघोले, संदीप सोरटे, गणेश वाघोले, विजय वाघोले, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या आखड्यानंतर सांयकाळी ग्रामस्थांच्या वतीने महापूजा, आरती, छबीना, पालखी मिरवणूक आदी
धार्मिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली.
दारुंब्रे : नागेश राक्षे यांना प्रथम क्रमाचे बक्षीस देताना राजेश वाघोले, विजय वाघोले, श्रीकांत वाघोले, काळुराम वाघोले ,विश्वास वाघोले आदी उपस्थित.
Smt१३Sf१.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63048 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..