
महागाई नियंत्रणात येईपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरवा
पिंपरी, ता. १४ : कोरोनानंतर देश आर्थिक संकटातून बाहेर निघताना त्याचा फटका उद्योग विश्वाला, व्यावसायिक, कामगार श्रमिक तसेच सर्वसामान्य वर्गाला बसला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपोरेटमध्ये ०.४० टक्के वाढ केलेली आहे. परिणामी, कर्ज महागले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत ५७ पैसे कमी झाला आहे. प्रति डॉलर ७६.९२ पैसे मोजावे लागणार असल्याने आयात महागली आहे. खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, सीएनजी दरवाढीमुळे वाहतूक महागली आहे. फळे, भाजीपाला, धान्य व खाद्यान्न प्रचंड महागले आहे. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे उत्पादन मूल्य वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य वर्गात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे, प्रतिमहा कुंटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरविण्याची मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे, समन्वयक रमाकांत पोतदार यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63141 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..