
ऐच्छिक रक्तदान करा
पिंपरी, ता. १३ ः सध्या महापालिकेच्या रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. दिवसागणिक रक्ताची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत रक्त संकलित होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. म्हणून सामाजिक बांधिलकीतून ऐच्छिक रक्तदान करा, असे आवाहन महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाच्या रक्तकेंद्राकडून करण्यात आहे. त्यासाठी त्यांनी छापील माहितीपत्रकांद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे.
--
ही व्यक्ति करू शकते रक्तदान
- वय १८ ते ६५
-वजन ४५ किलोपेक्षा जास्त
-हिमोग्लोबीन प्रमाण किमान १२.५
-सामाजिक बांधिलकी मानणारी
-परोपकाराची इच्छा मनात असणारी
-कोणतीही जात, धर्म, लिंग
रक्तदानाचे फायदे
- शरीरातच नैसर्गिकपणे तयार होणाऱ्या ताज्या रक्तामुळे ऊर्जा वाढते.
-आपला रक्तगट आपणास समजतो.
-ठराविक कालावधीनंतर केलेले रक्तमोक्षण (रक्तदान) प्रकृती स्वास्थ्य देते, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
- आंतरिक समाधान मिळते.
- आपल्या एखाद्या बांधवांचे प्राण वाचण्यास मदत होते.
- भविष्यात कदाचित आपल्यालासुद्धा रक्ताची गरज भासेल.
रक्तदानाविषयी
- ४५ किलो वजनाच्या व्यक्तीच्या शरीरात सुमारे ३५०० मि.ली रक्त असते.
- ६० किलो वजनाच्या व्यक्तीच्या शरीरात सुमारे ५००० मि.ली (५ लिटर) रक्त असते.
- आपले रक्त केवळ ३५० मिली घेतले जाते. आपले शरीर निसर्गतःच २४ तासात भरून काढते.
-रक्तदानास केवळ ५ ते ८ मिनिटे अवधी लागतो
--
रक्तकेंद्र ठिकाण संपर्क क्रमांक
-संजीवनी - भोसरी - ९७०२६५९७९७
-पिंपरी पीएसआय - पिंपरी - ९२२५५०७८१९
-ईएसआय - औंध - ८६५७४८५७४९
-मोरया - चिंचवड - ६३८४४८७४०५
-पीसीएमसी - पिंपरी -८०५५०५८०५८
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63145 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..