
रक्ताचे नातं
रक्तदानाच्या शतकाकडे उंबरठ्यावर
चिंचवडच्या शिक्षिका अंजू सोनवणे यांचा विधायक उपक्रम
पिंपरी, ता. १५ ः वयाच्या अठराव्या वर्षी डीएडला असताना भर दुपारी पुण्याच्या जिल्हा परिषद चौकात एका दुचाकीस्वाराने एका महिलेला धडकवले. त्यात तिचा पाय मोडला. भरपूर रक्तस्राव झाला. मी तिला ससूनला पोहोचवले, तिला रक्ताची अत्यंत गरज भासली. परंतु रक्त मिळत नव्हते, त्यासाठी तिचे नातेवाईक खटाटोप करत होते. तत्क्षणी मला रक्ताचे महत्त्व समजले. त्या दिवसापासून ठरवले की अशी वेळ कोणावरच येऊ नये, काही झाले तरी आपण रक्तदान करायचे, असा वस्तुपाठ चिंचवडच्या शिक्षिका अंजू सोनवणे यांनी घालून दिला आहे. त्यांनी ९८ वेळा रक्तदान केले आहे.
श्री फत्तेचंद जैन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षिका सोनवणे यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा रक्तदान केले. नंतर सतत तीन महिन्यांनी असेच वर्षांतून चार वेळा रक्तदान करण्याचा सिलसिला सुरू झाला. त्या शाळेत शिक्षिका असल्यामुळे त्यांनी पालक, महाविद्यालयातील मुले, मित्र-मैत्रिणी यांनाही प्रोत्साहित केले. तेही रक्तदान करू लागले. त्यांनी कार्याची व्यापकता वाढवत हळू सेवाभावी संस्थांमध्ये काम करू लागल्या. दरम्यान डीएसडब्ल्यूचे फिल्डवर्क त्यांनी चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर रक्तपेढीत केले. तीन महिने डॉक्टर महाजन यांच्या हाताखाली रक्तदान शिबिरे, रक्तदानाची माहिती याविषयी मार्गदर्शन मिळाले.
रक्तदानाची व्याख्याने देतेय
समाजात रक्तदानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सोनवणे यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदानाची व्याख्याने दिली आहेत. त्यातून त्यांनी रक्तदात्यांना तयार करण्याचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. यात अनेक लोक, अनेक संस्थांनी हातभार लावला. त्या स्वतः रक्तदान करीत, त्यांनी इतरांना प्रोत्साहित केले आहे. आतापर्यंत त्यांनी ९८ वेळा रक्तदान करून त्यांनी महाराष्ट्रात एकमेव सर्वोत्तम ‘महिला रक्तदाते’ असा लौकिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचा केला आहे. यापुढेही रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदानाचे कार्य पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.
असा एक किस्सा
१९८८ मध्ये अंजू सोनवणे-पाचारणे कुठे भेटतील? त्या रक्तदान करतात. आम्हाला तातडीने ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज आहे. हे समजताच त्या तत्काळ हो म्हणाल्या. संबंधित रूग्ण कर्करोगाच्या शेवटच्या घटकेत होता. त्याला फ्रेश रक्ताची गरज आहे, कारण तो काही काळच सोबती होता. त्याला आई-वडील, नवजात बालक, पत्नीला भेटायचे होते, हे ऐकताच डोळ्यात अश्रू उभे राहिले. रक्तदानानंतर त्या रुग्णाने हात उचलून मला मूकपणे डोळ्यांनीच धन्यवाद म्हटले, कधीच विसरणार नाही, असा किस्सा सोनवणे यांनी
रक्ताचे नाते
त्यांच्या परिचित आणि सतत कार्यरत काही संस्था आहेत. एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे त्या संस्था महाराष्ट्राबाहेर असल्या तरी महाराष्ट्रातील लोकांची रक्ताची गरज भागवतात. दिल्लीच्या माणसाला पुण्यात रक्त मिळते. पुण्यातल्या माणसाला राजस्थानमध्ये रक्त मिळते. जनसंपर्क ठेवल्यामुळे रक्ताचे नातं ट्रस्ट, नाते रक्ताचे संस्था(पुणे), एकनिष्ठ प्रतिष्ठान (खामगाव-शेगाव) जय महाराणा प्रताप संस्था (खांडवा), आकाश फाउंडेशन रामटेक (नागपूर) या संस्था प्रामुख्याने हातभार लावतात. रात्री अपरात्री कोणी किती बिझी असेल, तरी एकमेकांशी संपर्क करून गरजूंची रक्तदानाची गरज भागवतात.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63228 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..