जनसंवाद सभा मंगळवारी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंवाद सभा मंगळवारी होणार
जनसंवाद सभा मंगळवारी होणार

जनसंवाद सभा मंगळवारी होणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, सोमवारी (ता. १६) बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुटी आहे, त्यामुळे ही सभा मंगळवारी (ता. १७) सकाळी १० ते १२ यावेळेत होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ सभा झाल्या असून, यामध्ये सुमारे एक हजारापेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. जनसंवाद सभेकरीता महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63237 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top