कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल लुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल लुटला
कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल लुटला

कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल लुटला

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तरुणाकडील मोबाईल लुटला. हा प्रकार देहूरोड येथे घडला. याप्रकरणी आकाश शंकर परीटकर (रा. डॉ. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी हे मित्र साहिल सय्यद याला घेण्यासाठी हिंजवडी येथे जात होते. दरम्यान, दुचाकीतील पेट्रोल संपल्याने ते शिंदे पेट्रोल पंपाजवळ आले. दुचाकीवरून तिघेजण फिर्यादीजवळ आले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63277 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top