वंचित पक्षाचा स्वाभिमान दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित पक्षाचा स्वाभिमान दिन उत्साहात साजरा
वंचित पक्षाचा स्वाभिमान दिन उत्साहात साजरा

वंचित पक्षाचा स्वाभिमान दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने स्वाभिमान दिन उत्साहात साजरा केला. या दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, वृद्धाश्रमात फळे व मिठाई वाटप, शाहिरी जलसा, भटक्या-विमुक्त समाजाच्या मुलांना अन्नदान केले.

सेक्टर २२, निगडी या ठिकाणी शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांच्या जलस्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे होते. सांगवी शाखेच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील मदर टेरेसा वृद्धाश्रमात फळे व मिठाईचे वाटप केले. यावेळी शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे उपस्थित होते. तसेच, महात्मा फुले नगर, पिंपरी वॉर्ड शाखेच्या वतीने ऑनलाइन सभासद नोंदणी अभियान राबविले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63399 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top