संभाजी महाराज यांची जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी महाराज
यांची जयंती साजरी
संभाजी महाराज यांची जयंती साजरी

संभाजी महाराज यांची जयंती साजरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : चिंचवड, बर्ड व्हॅली उद्यान येथे स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्यावतीने साजरी केली. यावेळी शहराध्यक्ष प्रवीण कदम, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’.. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय,’ छत्रपती शिवाजी महाराज की जय..’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधरचे नेते मनोजकुमार गायकवाड यांनी ‘संभाजी महाराज आणि जीवन संघर्ष’ या विषयावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. पुतळा परिसरात मंडपामध्ये बालशाहीर विरोचन कदम यांनी ‘शंभु राजमुद्रा त्याचा अर्थ व स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे ‘शंभु राजांचा महिमा’ गीत म्हणून दाखविले. उपाध्यक्ष तेजस गवई, सचिव श्रीकांत गोरे, कोषाध्यक्ष राजेश सातपुते, नारायण बिरादार, उद्योजक सदाशिव लोभे, रामभाऊ क्षीरसागर, संघटक जगदीश दुधभाते, एजाज शेख, राहुल पवार, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर तोंडे, परमेश्वर माने हे सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63402 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top