
आयुक्त राजेश पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी, ता. १४ ः ‘‘विद्यार्थ्यांनी करिअर बाबतीत सजग राहिले पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे आपण अनेक संधींना मुकतो. त्यामुळे वाचन, अनुभव आणि आपल्यातील उणिवा दूर करून स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे,’’ असा सल्ला आयुक्त राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमामध्ये ‘मोर ओडिशा डायरी : आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ मध्ये मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड. संदीप कदम अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम उपस्थित होते.
आयुक्तांनी आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तसेच, ओडिशा राज्यामध्ये काम करताना दुर्गम व आदिवासी भागामध्ये आलेली आव्हाने, स्थानिक प्रश्न याविषयी माहिती देताना मयुरभंज जिल्ह्यामध्ये वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गत केलेल्या अभियानावर प्रकाश टाकला. या सुसंवाद उपक्रमामध्ये आयुक्तांनी प्रतिमा जेटीथोर, शुभम दौंड, हर्षदा फुगे, सुदर्शन गिराम, अनिकेत जाधव, तनय सुधार, अश्विनी दाभाडे, सानिका कुंभार या विद्यार्थ्यांचे अनुभव मांडले. यामध्ये ॲाफलाइन व ॲानलाइन पद्धतीने सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. विजय बालघरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. क्रांती बोरावके यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63425 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..