
ओला-उबेरवर धडक कारवाई
पिंपरी, ता. १५ : कोरोना काळात व त्यानंतरही खासगी प्रवासी वाहनातून अवाजवी भाडे आकारणाऱ्या ॲपधारित ओला-उबेरवर धडक कारवाई करण्याचे आदेश नुकतेच परिवहन आयुक्तालयाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांना दिले आहेत. त्यानुसार तीन फ्लाइंग स्कॉडची नेमणूक करण्यात आली असून, परमीट नसणाऱ्या वाहनांवर (ता. १७) मंगळवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
आधीच महागाईने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त भाडे आकारणी करणाऱ्या बेकायदा प्रवासी वाहनांमुळे प्रवाशांचा खिसा रिकामा होत आहे. या त्रासाला मात्र सर्वसामान्य नागरिक वैतागले होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी कॉल असल्याचे सांगून तसेच गर्दी असल्याचे कारण देत जादा पैसे या कंपन्यांकडून उकळले जात आहेत. ओला-उबेर हे अनधिकृत पद्धतीने खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे अपघात झाल्यानंतर या कंपन्यांच्या ॲप बिझनेसमुळे कोणालाही जबाबदार धरता येत नव्हते. त्यामुळे आरटीओच्या कार्यपद्धतीवर मोठी टिकाटिपण्णी करण्यात आली होती. शासकीय प्रवासी वाहनांच्या तुलनेत १५ टक्के जादा भाडेवाढ आकारली जात असल्याचे समोर आले आहे.
ओला-उबेरच्या कंपन्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास गेल्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा वाहन परवाना देण्यात आला होता. मात्र, सरसकट सर्व वाहनांना हा परवाना देण्यात आला नव्हता. तरीही, सर्रास लूट सुरू असल्याचे दिसून आले होते.
मोबाईल बॅटरीमध्ये बिघाड झाला किंवा पाऊस सुरू असतो. तसेच, कार्यालयीन वेळा, हॉस्पिटल गर्दी, बाजारपेठा अशा ठिकाणी संधी साधून ॲपमधील सूचनेनुसार अल्गोरिदम दाखवून या कंपन्या भाडेवाढ करतात. ते चुकीचे आहे. वाहतूक हा नागरिकांचा हक्क आहे. ओला-उबेर या दोन्ही बेकायदा खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांमध्येच स्पर्धा सुरू आहे. मीटरमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड करून प्रवाशांना स्वस्तात भाडे मिळवून दिले जात आहे. सध्या आरटीओच्या हातामध्ये अधिकार आले आहेत. ते परवाने पूर्णपणे रद्द करू शकतात. त्यामुळे ठोस कार्यवाही व्हायला हवी.’’
- डॉ. केशव क्षीरसागर, बघतोय रिक्षावाला संघटना, अध्यक्ष
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63426 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..