अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षांबाबत आज मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षांबाबत आज मार्गदर्शन
अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षांबाबत आज मार्गदर्शन

अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षांबाबत आज मार्गदर्शन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः ‘सकाळ विद्या’ व ‘एक्‍सिड’च्या (एक्‍सलंट एज्युकेशन) वतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रातील करिअर, प्रवेश परीक्षांबाबत रविवारी (ता. १५) मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले आहे. प्रवेश परीक्षा आणि आयआयटीसाठी कशी तयारी करावी, या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी १० वाजता चर्चासत्राला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना प्रा. आशिष दुबे मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच आयआयटीसारखी स्पर्धा परीक्षा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची इच्छा आहे. त्यासाठी अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच सीईटी, जेईई, नीट आणि केव्हीपीवाय या प्रवेश परीक्षांची तयारी, तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे, सहावी-दहावीपासूनच तयारीला लागलो, तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी आयआयटी, एनआयटी, बीट्‌स, व्हीआयटी, आयआयएससी, आयसर, एनआयएससीआर या सारख्या देशभरातील नामांकित शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेशप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.

असा होणार कार्यक्रम
कधी- रविवार, ता. १५ मे २०२२
केव्हा - सकाळी १० वाजता
कोठे - प्रा. रामकृष्ण मोरे, प्रेक्षागृह- चिंचवड
प्रवेश - विनामूल्य
नाव नोंदणी आवश्‍यक व संपर्क - ९८८१९०७२५२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63464 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top