
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक पाठशाळेचे आयोजन
पिंपरी, ता. १४ ः ‘‘मूल जन्मल्यापासून ते सक्षम होईपर्यंत आणि त्यानंतर ते त्यांच्या जीवनामध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे म्हणजे सुजाण पालकत्व होय,’’ असे प्रतिपादन ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. स्वप्नाली धोका यांनी केले.
स्कूलमध्ये पालक पाठशाळेचे आयोजन केले होते. यावेळी मुख्याध्यापिका विद्युत सहारे, शिक्षक व पालक उपस्थित होते. या सत्राची सुरुवात डॉ. धोका यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ असल्याने त्या कायमच बालविकास आणि समुपदेशन करतात. या सत्रातही त्यांनी मुलांचे संगोपन कसे करावे, कशाप्रकारे त्यांना कोणत्याही कामात प्रोत्साहित करावे, कोणत्या गोष्टी मुलांसाठी हानिकारक व लाभदायक आहेत, आपण मुलांची समजूत कोणत्या प्रकारे काढावी, अशा अनेक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी पालकांच्या शंकांचे समाधानही अगदी सहज सोप्या शब्दांत धोका यांनी केले. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी असा कार्यक्रम होईल, त्यांनी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लिन्सी बिनॉय व पुनम शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. पार्वती रावत यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63483 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..