पिंपरी : मालमत्ताकर सवलत योजना पूर्वीप्रमाणे कायम ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
पिंपरी : मालमत्ताकर सवलत योजना पूर्वीप्रमाणे कायम ठेवा

पिंपरी : मालमत्ताकर सवलत योजना पूर्वीप्रमाणे कायम ठेवा

पिंपरी - मालमत्ता कर (Property Tax) विषयक विविध सवलत योजना (Concession Scheme) टप्प्याटप्याने बंद करण्याचा महापालिका प्रशासकांनी (Municipal Administrative) घेतलेला निर्णय चुकीचा आहे. कोरोना काळातून नागरिक आता सावरत असताना त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यासाठी या सवलती पूर्वीप्रमाणे सुरु ठेवाव्यात. तसे निर्देश प्रशासकांना द्यावेत, अशी मागणी शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीच्या तीन लाटा, दोन लॉकडाऊन यामुळे नोकरी, व्यापार, उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. सामान्य माणसाच्या हातचा रोजगार गेला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. कुटुंबीयांना घेऊन शहरात कसे जगायचे याची भ्रांत असताना मालमत्ताकर आगाऊ भरणाऱ्या करदात्यांना, तसेच महिला मालमत्ताधारकांना महापालिकेने ‘जोर का झटका’ दिला आहे.

सामान्य करात देण्यात येणारी करसवलत पुढील आर्थिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय प्रशासक राजेश पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फटका शहरातील सुमारे दीड लाख मालमत्ताधारकांना बसणार आहे. सवलत बंद केली जाणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. सवलत मिळत असल्याने नागरिक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कराचा भरणा करत होते. परिणामी, महापालिका तिजोरीत भर पडत होती. त्यावर परिणाम होईल.

एकीकडे सर्वसामान्य करदात्यांना आर्थिक झटका देताना शैक्षणिक संस्थांची कर सवलतीची मागणी नसताना त्यांना सवलत योजना लागू केली आहे. हे आश्चर्यजनक आहे, याकडेही घोळवे यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63486 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top