
सुट्टीत धम्माल करा, पण पोहताना नको
पिंपरी, ता. १४ : उन्हाळी सुट्टी म्हणजे बच्चे कंपनीची धमाल! महिनाभराच्या या काळात गावी जाणे, छोट्या सहली काढणे, विविध छंद जोपासणे, नवनवीन कला, खेळ शिकणे...असे बरेच काही केले जाते. यातील एक म्हणजे पोहायला शिकणे किंवा पोहायला जाणे. यासाठी विहीर, नदी, तलावाकडे धाव घेतली जाते. शहरी भागातील तरण तलावात शिबिरे भरवली जातात... एकूणच पोहण्याचा आनंद लुटताना अतिशय काळजी घ्यावी लागते. अन्यथा जिवावरही बेतू शकते. तशा घटना दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत घडतात.
--
अशी घ्या काळजी
स्वतःच्या शारीरिक प्रकृतीचा अंदाज घ्या
लहान मुलांनी पालकांना सोबत घ्यावे
सुरुवातीला लाइफ जॅकेटचा वापर कराच
सराव हा कमी तळ असलेल्या ठिकाणीच करा
तरण तलावावरील जीवरक्षकाला कल्पना आधी द्या
सुरुवातीला उडी व सूर मारू नका
पाण्याचा अंदाज असेल तरच पोहायला जा
फोटो शूटचा मोह टाळा
अति आत्मविश्वास टाळा
दंगा, मस्ती, हुल्लडबाजी करू नका
स्टंटबाजी, जिवावर बेतणारे प्रयोग नकोत
पर्यटनावेळी नवीन ठिकाणचा अंदाज नसल्याने पोहणे टाळा
नदीवर अथवा धरणात पोहताना सोबत प्रशिक्षित व्यक्ती सोबत असावीच
--
काही घटना
मागील आठवड्यात आकुर्डीतील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. यासह इंदोरीतील कुंडमळा, कासारसाई, भुशी धरण येथेही वारंवार घटना घडत असतात. या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63537 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..