
किऑस्क मशिन वापराविना
पिंपरी, ता. १५ ः लसीकरण केंद्रावरील गोंधळ कमी करण्यासाठी महापालिकेने वर्षभरापूर्वी ‘किऑस्क’ टोकन पद्धतीचा अवलंब केला. परंतु सद्यःस्थितीत लाखो रुपये किमतीच्या किऑस्क मशिन वापराविना पडून आहेत. मशिनरी योग्यरीत्या हाताळण्यात न आल्याने निरुपयोगी ठरत आहेत.
शहरात मोफत कोव्हिड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध करून देताना प्रत्येक कार्यालयात आलेल्या लसीकरण केंद्रांद्वारे कार्यान्वित आहे. व्हॅक्सिनेशनच्या रजिस्ट्रेशनसाठी या मशिनचा उपयोग करण्यात येतो. या मशिनच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण थोडा कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागू नये आणि प्रत्येकाचा वेळ वाचावा यासाठी तयार करण्यात आलेल्या मशिन सध्या वापराविना निरुपयोगी बनल्या आहेत. आचार्य अत्रे रंगमदिराबाहेरील मशिन उपयोगाविना सध्या बंद स्थितीत आहेत. हीच परिस्थितीत शहरातील अन्य मशिनची आहे. लाखो रुपये मूल्याच्या या मशिनरी सध्या धूळखात पडल्या आहेत. या मशिनरीमध्ये तांत्रिक गोष्टी नागरीकांना समजत नसल्याने या मशीनकडे पाठ फिरवत आहेत.
ऑपरेटची गरच
काही ठिकाणची यंत्रे अद्यापही धूळ खात पडल्या आहेत. काही ठिकाणी टोकण देताना बंद पडते. तर काही यंत्रांमधून प्रिंट मिळत नाही, स्क्रिनवरचे बटण दाबल्यास अंक लवकर उमटत नाहीत, काहींना मोबाईलवर संदेश जातो, तर काहींना टोकणची प्रिंट मिळत नाही, अशा समस्या भेडसावतात. त्यामुळे काही ठिकाणीच गर्दी असते. काही ठिकाणी मार्गदर्शनासाठी महापालिकेने लिपिकांची नेमणूक करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
का आहेत बंद
या पद्धतीनुसार कॉम्प्युटर प्रणालीद्वारे नागरिकांनी ते राहत असलेल्या ठिकाणी जवळ असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन आपला मोबाईल, जन्माचे वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस याबाबतची नोंद करायची आहे. त्यानंतर या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा ओटीपी ‘किऑस्क’मध्ये नोंदवून माहिती समाविष्ट करायची आहे. नोंद झाल्यानंतर नागरिकांस छापील टोकन प्राप्त होईल; तसेच टोकण क्रमांक एसएमएसद्वारे नागरिकांस पाठविण्यात येतो. पण बहुतांश नागरीकांना यंत्राची कार्यपद्धती सोपी असूनही लक्षात येत नाही. अशिक्षित नागरिकांना टोकन घेण्यासाठी अडचणी उद्भवतात. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना ते ऑपरेट करता येत नसल्यामुळे मशिन शोभेचे बाहुले बनले आहे.
‘‘लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी किऑक्स मशिन बसविल्या आहेत. पण त्या नागरीकांना हाताळता येत नाहीत. त्यामुळे त्यांचा नागरिक पुरेसा वापर करत नाहीये. त्याठिकाणी ऑपरेटरची मागणी होत आहे.’’
-शिरीष पोरेड्डी, प्रवक्ता महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63545 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..